Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात; सलग दुसऱ्या दिवशी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात; सलग दुसऱ्या दिवशी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

महाराष्ट्रातील कोरोनाची तिसरी लाट बऱ्यापैकी आटोक्यात आली असून सध्या राज्यात 960 सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्यात आज 103 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 48 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. गेल्या 24 तासात राज्यात 107 बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात उष्माघाताने घेतला पहिला बळी

आज एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद राज्यात झाली नाही. त्यामुळे राज्याचा डेथरेट 1.87 टक्के झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 77,24,982 बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,93,08,018 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,73,722 (09.93 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या 960 अॅक्टिव्ह रुग्ण राज्यात आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. 300 अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईत आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहेत. ठाण्यात 167 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -