बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी नुकतेच ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आलिया आणि रणबीर या दोघांची जोडी एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय दोघांनाही लग्नाच्या बेडीमध्ये अडकलेले पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांचे डोळे आसुसले आहेत. अनेकदा आलिया भट्ट आणि रणबीर कपूर कधी लग्न करणार असा प्रश्न सर्वांना पडतो. या वर्षी डिसेंबरमध्ये ते लग्न करणार असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली. पण अशात समोर आलेली खास गोष्ट म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच एंगेजमेंट करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एप्रिल महिन्यात एंगेजमेंट करू शकतात. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले होते की, दोघांच्या लग्नासाठी एप्रिल महिना खूप लवकर जाईल. कारण सध्या हे दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटात व्यग्र आहेत. अशा परिस्थितीत दोघेही डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. आलिया आणि रणबीर एप्रिलच्या अखेरीस एंगेजमेंट करू शकतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना त्यांच्या कामातून सुट्टी मिळणारा डिसेंबर महिना असल्याने दोघेही लग्नासाठी हाच महिना निवडणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नुकतेच रणबीर कपूरचीही त्याच्या लग्नासंदर्भात चौकशी करण्यात आली होती. मात्र, रणबीरने तारीख जाहीर करण्यास स्पष्ट नकार दिला होता. रणबीर कपूरला मीडियाने आलिया भट्टसोबतच्या लग्नाच्या तारखेबद्दल वारंवार विचारले होते आणि तो म्हणाला की, ‘मला वेड्या कुत्र्याने चावले नाही की मी मीडियासमोर तारीख जाहीर करावी.’ रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची बनावट लग्नपत्रिकाही सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाली आहे.