Tuesday, November 25, 2025
Homeब्रेकिंगआधी IPS, नेते हात जोडून उभे असायचे आता त्यांनीच ‘भगवा’ उतरवला, रेपचा...

आधी IPS, नेते हात जोडून उभे असायचे आता त्यांनीच ‘भगवा’ उतरवला, रेपचा आरोपी सीताराम दास अखेर अटकेत

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवामध्ये बलात्काराचा आरोपी महंत सीताराम (Mahant Sitaram) याला पोलिसांनी अटक केली आहे. महंत वेशांतर करुव उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. आतापर्यंत पोलिसांनी दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत, तर दोघा आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपी महंत सीतारामला पोलिसांनी मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून अटक केली. व्हीआयपी राज निवासमध्ये 28 मार्च रोजी कथावाचक महंत सीतारामने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. महंत सीताराम दास उर्फ सीताराम त्रिपाठी उर्फ समर्थ याला पोलिसांनी सिंगरौली जिल्ह्यातून अटक केली आहे. सीताराम दास वेशांतर करण्यासाठी बैढन बस स्टँडमधील एका सलूनमध्ये गेला होता.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर इशारा दिल्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने महंत सीतारामला बेड्या ठोकल्या. महंत सीताराम त्रिपाठी, विनोद पाण्डेय, धीरेंद्र मिश्रा आणि मोनू मिश्रा यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना अटक झाली असून दोघं फरार आहेत.

बलात्काराचा आरोप असलेला महंत सीताराम पोलीस सुरक्षेतही बाहेर फिरत होता. अनेक मोठमोठे बिल्डर्स आणि उद्योजकही या बाबाचे भक्त असल्याचं बोललं जातं. तो प्रसिद्ध संत आणि माजी राज्यसभा खासदार वेदांती महाराज यांचा जवळचा नातलग असल्याचं सांगितलं जातं.

फक्त राजकीय नेतेच नव्हे तर पोलीस अधिकाऱ्यांचाही बाबाच्या भक्तांमध्ये समावेश आहे. एका फोटोत मध्य प्रदेशच्या रीवामधील एसपी नवनीत भसीन यांच्यासोबतचा फोटोही समोर आला आहे. यात एसपी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जात असल्याचं दिसून आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -