Sunday, July 27, 2025
Homeमनोरंजनयुट्यूबर भुवन बाम याला महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं पडलं भारी

युट्यूबर भुवन बाम याला महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं पडलं भारी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

युट्यूबर भुवन बामने ऑटोमॅटिक गाडी नावाचा व्हिडिओ अपलोड युट्यूबला अपलोड केला आहे. तो व्हिडिओ १ कोटी २४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये भुवनने पहाडी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. आता त्याने माफी मागितली आहे.


यूट्यूबर आणि अभिनेता भुवन सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. अलीकडेच त्याच्या एका व्हिडिओवरून वाद निर्माण झाला होता. त्याने महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. जेव्हा हे प्रकरण वाढले तेव्हा राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेतली. त्यानंतर भुवनने माफी मागितली.

त्याने ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये भुवन म्हणाला- व्हिडिओ एडिट करून वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला आहे. भुवन पुढे म्हणाला, तो महिलांचा आदर करतो आणि त्याचा असा कोणताही हेतू नव्हता. त्याने गेल्या आठवड्यात त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती.


ऑटोमॅटिक व्हेईकल’ नावाने हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. तो आतापर्यंत १ कोटी २४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये भुवनने पहाडी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राष्ट्रीय महिला आयोगाने ट्विट करून दिल्ली पोलिसांना कॉमेडियनविरोधात एफआयआर नोंदवण्याची विनंती केली.

ट्विट करून माफी मागितली
भुवनने ट्विटमध्ये म्हटले की, ‘मला समजले की, माझ्या व्हिडिओतील एका भागामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. तो भाग काढून मी व्हिडिओ एडिट केला आहे. जे मला ओळखतात त्यांना माहित आहे की, मला महिलांबद्दल खूप आदर आहे. कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांची मी मनापासून माफी मागतो. पहाडी महिलांचा उल्लेख असलेला दुसरा भाग आता काढून टाकण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -