Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात मतदारांना पेटीएमद्वारे एक हजाराची लाच?, ईडीकडे तक्रार करणार: चंद्रकांत पाटील

कोल्हापुरात मतदारांना पेटीएमद्वारे एक हजाराची लाच?, ईडीकडे तक्रार करणार: चंद्रकांत पाटील

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघर फिरून एका शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी मतदारांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करत आहेत. मतदानाच्या वेळी बँक खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठविले जाण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे हे मनी लाँडरिंग आहे. मनी लाँडरिंगच्या प्रयत्नाची ईडीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणी करणार आहे. शहरातील मतदारांनाही आपले आवाहन आहे की, थोड्या रकमेच्या मोहात पडून आपले बँक खात्याचे तपशील देऊ नये, पुढे ईडीच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याचा धोका आहे, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संशय व्यक्त केला. तसेच निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी कोणत्याही थराला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.


अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील दारू दुकानदारांची बैठक घेऊन काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. काँग्रेसला पराभव दिसू लागल्याने सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे. परंतु, आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारू, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


मुंडे, फडणवीस, आठवले कोल्हापुरात
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला गती आली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार 4 व 6 एप्रिल रोजी प्रचारात भाग घेतील. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे 6 एप्रिल रोजी प्रचार करतील. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर 7 एप्रिल रोजी सभांना संबोधित करतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे 9 व 10 एप्रिल रोजी कोल्हापुरात प्रचारासाठी येतील. याखेरीज पक्षाचे अनेक नेते मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -