Monday, July 28, 2025
Homeमनोरंजनतुम्ही पाहिलात का ‘जत्रा 2’ चा टीझर ?

तुम्ही पाहिलात का ‘जत्रा 2’ चा टीझर ?

ताजी बातमी ऑनलाइन टीम

२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या जत्रा चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले होते. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. आज गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर केदार शिंदे यांनी त्यांच्या या चित्रपटाची घोषणा केली. तर कुशल बद्रिकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.


चित्रपटाचा टीझर कुशल बद्रिकेने शेअर केला आहे. कुशल हा मजेशीर टीझर शेअर करत म्हणाला, ह्यालगाड आणि त्यालागाडची जत्रा आनंदमयी झाली, त्याला १६ वर्षाहून जास्त काळ लोटला आहे… कोंबडी पळून सुद्धा आता बरीच वर्ष झाली आहेत.. पण अजूनही तुमचा ताब्या आमच्या राजुत आहे! म्हणूनच ह्या

गुढीपाव्यानिमित्त तुम्हा सर्व रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतोय.. आपलं ठरलय.. तुमच्यासाठीच ठरवल आहे.. आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी आनंदाची मेजवानी घेऊन येतोय.. ह्या नवीन वर्षात तुम्हाला हसवायला ‘जत्रा 2’ येतोय! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!अलबत्या गलबत्या कोण फोडेल, असे कॅप्शन कुशलने दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -