ताजी बातमी ऑनलाइन टीम
सोशल मीडिया स्टार लोगन पॉलने (Logan Paul) WWE WrestleMania मध्ये प्रवेश केला ही बाब अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. WWE WrestleMania या शोमध्ये प्रवेश करतानाची त्याची स्टाईलही भलतीच चर्चेत आहे. या शोमध्ये जाताना त्याने जगातील सर्वात महागडे पोकेमॉन कार्ड (Pokemon Card) गळ्यात घातलं होतं. त्याची किंमत 45 कोटींहून अधिक असल्याचं बोललं जातंय. हे अतिशय दुर्मिळ पिकाचु ग्राफिक कार्ड आहे. त्याचा हा अश्या लूकमधला एक व्हीडिओ WWE ने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. यात त्याच्या गळ्यात एक पोकेमॉन ट्रेड कार्ड दिसत आहे. त्याच्या कार्डमुळे त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Guinness Book of World Records) नाव कोरलं गेलं आहे. त्याचा हा व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, लोगन पॉलला हे PSA 10 ग्रेड पिकाचू इलस्ट्रेटर कार्ड 45 कोटी रुपयांना मिळाले आहे. पॉलने 22 जुलै 2021 रोजी हे कार्ड खरेदी केलं. हे जगातील सर्वात महाग पोकेमॉन ट्रेड कार्ड आहे.”पिकाचू इलस्ट्रेटर हे जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत दुर्मिळ पोकेमॉन कार्ड आहे. 1998 च्या स्पर्धेतील केवळ 39 विजेत्यांना ते मिळाले. यापैकी फक्त एकालाच 10 ग्रेड मिळाले. जे मी खरेदी केलं”, असं लोगान पॉल याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी बोलताना सांगितलं.
PSA ग्रेड 10 पिकाचू इलस्ट्रेटर कार्ड मिळविण्यासाठी लोगन पॉल यांना त्यांचं PSA ग्रेड 9 पिकाचू इलस्ट्रेटर कार्ड द्यावं लागलं. जे त्याने इटलीच्या मॅट ऍलनकडून 9.6 कोटींना खरेदी केलं होतं. याशिवाय त्याला कार्डसाठी 30 कोटी रुपये द्यावे लागले. या कार्डची किंमत किंमत सुमारे 45 कोटी रुपये आहे.
सोशल मीडिया स्टार लोगन पॉलने WWE WrestleMania मध्ये प्रवेश केला ही बाब अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी होती. WWE WrestleMania या शोमध्ये प्रवेश करतानाची त्याची स्टाईलही भलतीच चर्चेत आहे. त्याच्या गळ्यात एक पोकेमॉन ट्रेड कार्ड दिसत आहे. त्याच्या कार्डमुळे त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नाव कोरलं गेलं आहे. त्याचा हा व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.