ताजी बातमी ऑनलाइन टीम
बॉलिवूडचे (Bollywood) सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर आज 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या कारकिर्दीत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या जितेंद्र यांचा आजही मोठा चाहता वर्ग आहे. आपली डान्स स्टाईल आणि दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी त्याकाळात प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्याकाळामध्ये जितेंद्र हे तरुणाईंच्या गळ्यातील ताईत होते. दमदार अभिनयामुळे जितेंद्रला बॉलिवूडचा ‘जंपिंग जॅक’ असे देखील म्हटले जायचे. फार कमी लोकांना माहीत असेल की जितेंद्र कपूर यांचा जन्म एका ज्वेलर्सच्या घरात झाला. त्याचे खरे नाव रवी कपूर आहे. चित्रपटात काम करायला लागल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले. जितेंद्र कपूर यांना सुपरस्टार होण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला. त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त (Jitendra Kapoor Birthday) त्यांच्या आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेणार आहोत..
दुल्हन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जितेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झआली. हेमा मालिनी आणि जितेंद्रच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न निश्चित केले होते. हेमा मालिनी यांना धर्मेंद्र आवडत होते त्यांनी ही गोष्ट धर्मेंद्र यांना सांगितली. दुसरीकडे, हेमा मालिनी यांच्या कुटुंबीयांनीही या लग्नासाठी पूर्ण तयारी केली होती. पण या काळात जितेंद्र हे त्याची सध्याची पत्नी शोभा कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होते. या दरम्यान, जितेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे लग्न चेन्नईमध्ये असल्याच्या बातम्या त्याकाळी प्रसिद्ध झाल्या होत्या.
हेमा मालिनी आणि जितेंद्र यांच्या लग्नाची माहिती धर्मेंद्र यांना समजल्यावर त्यांना खूप राग आला. हे लग्न थांबवण्यासाठी त्यांनी एक युक्ती शोधून काढली. शोभासोबत धर्मेंद्र मद्रासला पोहोचले. तेथे पोहोचताच शोभा यांनी गोंधळ घातला. त्यामुळे जितेंद्र आणि हेमा यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यावेळी धर्मेंद्र दारूच्या नशेत होते. मुलीच्या लग्नात झालेला गोंधळ पाहून हेमा मालिनी यांच्या वडिलांनी धर्मेंद्र यांना घरातून हाकलून दिले. मात्र, अखेर जितेंद्र आणि हेमाचे लग्न मोडले.