Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगवाइन विक्री केल्यास दुकाने फोडू, राज्य सरकारच्या जाहिरातीवरून खा. इम्तियाज जलील यांचा...

वाइन विक्री केल्यास दुकाने फोडू, राज्य सरकारच्या जाहिरातीवरून खा. इम्तियाज जलील यांचा पुन्हा इशारा

किराणा दुकाने, सुपरमार्केट आणि मॉलमध्ये वाइन विक्रीसंदर्भात हरकती आणि सूचना मागवण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra State) नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तुम्ही दुकानांमध्ये वाइनची विक्री (Wine Selling) करा, आम्ही दुकान फोडतो, महाराष्ट्र सरकारच्या या निर्णायाविरोधात महिलांनी उघडपणे समोर यावे, असे आवाहनदेखील खासदार जलील यांनी केले आहे. यापूर्वीदेखील राज्य सरकारने वाइन विक्रीसंदर्भातील धोरणाची घोषणा केली होती तेव्हा खासदार जलील यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली होती. कुणाची हिंमत असेल तर औरंगाबादच्या दुकानांमध्ये वाइन विक्री करून दाखवा.

ज्या दुकानात पहिल्यांदा वाइन येईल, ते दुकान आम्ही फोडणार, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर सदर धोरणासंदर्भाने राज्य सरकारने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यावरही खासदारांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यामुळे राज्य सराकरला वाइन विक्री धोरणाची अंमलबजावणी करताना औरंगाबादमध्ये तीव्र प्रतिक्रियेला सामोरे जावे लागणार, असे दिसतेय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -