Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; जिल्ह्यातील आठ धरणे पूर्ण भरली

कोल्हापूर ; जिल्ह्यातील आठ धरणे पूर्ण भरली


जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांत 90.69 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या एकूण पाणी क्षमतेच्या तुलनेत 98.77 टक्के पाणीसाठा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला तर जिल्ह्याची जूनपर्यंतची पाण्याची चिंता मिटणार आहे.

जिल्ह्याची क्षमता 91.81 टीएमसी
जिल्ह्यातील चार मोठ्या धरणांसह प्रमुख 15 धरणांत 91.81 टीएमसी पाणीसाठा इतकी क्षमता आहे. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील या 15 धरणांत 90.69 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यानुसार पाऊस झाला तर सप्टेंबरअखेर जिल्ह्यात पूर्ण 91.81 टीएमसी पाणीसाठा होईल.

आठ प्रकल्प पूर्णक्षमतेने भरले
जिल्ह्यातील राधानगरी, तुळशी, कडवी, चित्री, चिकोत्रा, कोदे, जांबरे आणि घटप्रभा हे आठ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. आंबेओहळ प्रकल्पात पूर्ण क्षमतेपैकी कमी पाणी साठवले आहे. दूधगंगा, वारणा, कुंभी, कासारी, पाटगाव, जंगमहट्टी ही धरणे पूर्णक्षमतेने भरलेली नाहीत.

चांगल्या पावसाची गरज
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची अजूनही गरज आहे. या महिन्यात पाऊस झाला तर शेतीसाठी धरणांतील पाण्याचा पुरवठा उशिराने सुरू होईल, त्यामुळे धरणांतील पाणीसाठा जूनपर्यंत पुरवता येईल, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

सहा धरणक्षेत्रात कमी पाऊस
गेल्या वर्षीच्या तुलनेत राधानगरी, पाटगाव, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे व जांबरे या सहा धरणक्षेत्रांत शनिवारअखेर कमी पाऊस झाला. उर्वरित नऊ धरणक्षेत्रांत गेल्यावर्षीच्या तुलनेइतकाच पाऊस झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -