Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरआयात कर कमी केल्याने खाद्यतेल होणार स्वस्त

आयात कर कमी केल्याने खाद्यतेल होणार स्वस्त


पाम, सोयाबीन तसेच सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील आधार आयात कर (Import tax) केंद्र सरकारने कमी केला आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर कमी होणार आहेत. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार क्रूड तसेच रिफाईंड पाम, सोया व सूर्यफूल तेलावरील आधार आयात कर कमी केले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात वरील खाद्यतेल 3 ते 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

कोरोनाचे संकट तसेच जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचे वाढलेले दर यामुळे यंदा खाद्यतेलाची आयात कमी (Import tax) होऊ शकते. किंबहुना आयातीचा आकडा सहा वर्षांच्या नीचांकी स्तरावर राहू शकतो, असा अंदाज सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एसईए) व्यक्त केला आहे.

तसे झाले तर सलग दुसर्‍या वर्षी खाद्यतेलाची भारतातील आयात कमी राहील. बेस आयात शुल्क कमी केल्यामुळे नागरिकांना मात्र काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. खाद्यतेलाच्या आयातीचा विचार केला तर याबाबतीत भारत जगात आघाडीवर आहे. देशाला दोन तृतीयांश खाद्यतेलाची आयात विदेशातून करण्यात येते. विशेषतः इंडोनेशिया आणि मलेशिया येथून मोठ्या प्रमाणावर पामतेलाची आयात होते.

ग्राहकांना मिळणार दिलासा
कोल्हापूर ः आयात शुल्क कमी केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खाद्यतेलाचे दर प्रतिकिलो 3 ते 5 रुपयांनी स्वस्त होणार आहेत. यंदाच्या पावसामुळे तेलबियांचे उत्पादन कमी प्रमाणात होणार आहे. यापूर्वी कोल्हापुरात शेंगतेलाचा सर्वोच्च दर हा 190 रुपये प्रति किलो झाला होता. अजूनही यात फारसा फरक नाही. पण आयात शुल्क कमी केल्याने शेंगतेल, सरकी, सोयाबीन, सूर्यफूल व पामतेलाच्या किमती 3 ते 5 रुपयांनी कमी होणार आहेत, असे तेलाचे होलसेल विक्रेते प्रशांत घोडके यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -