Saturday, January 11, 2025
Homeब्रेकिंगया भागातील बँकेला आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 4 लाखांचा दंड

या भागातील बँकेला आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 4 लाखांचा दंड


भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार सहकारी बॅंकांना दणका दिला आहे. आरबीआयच्या नियमांकडे सहकारी बँकांनी दुर्लक्ष केल्यामुळे तब्बल 4 लाखांचा दंड ठोठावला आहे. महाराष्ट्रातील तीन तर मध्यप्रदेशातील एका बँकेचा या चार बँकांमध्ये समावेश आहे. ज्या बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे त्यामध्ये नाशिकमधील अंदरसूल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, लातूरमधील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक आणि मध्य प्रदेशातील जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादीत या बँकांचा समावेश आहे.

चार सहकारी बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एकूण 4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या चार स्वतंत्र स्टेटमेंटनुसार, हा दंड नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ठोठावण्यात आला आहे. बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेले व्यवहार किंवा करार यांच्या वैधतेबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा यातून कोणताही हेतू नसल्याचे आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नाशिकमधील अंदरसूल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला दीड लाख रुपये आणि लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख रुपयांचा दंड, तर महाराष्ट्रातील नांदेड मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला 50,000 रुपयांचा दंड त्याचबरोबर मध्य प्रदेशातील शहडोल येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला एक लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे.

यापूर्वीही रिझर्व्ह बँकेने 5 एप्रिल रोजी अनेक बँकांना दंड ठोठावला होता. त्यावेळी, आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते की, फलटणस्थित यशवंत सहकारी बँक लिमिटेडला उत्पन्न, मालमत्ता वर्गीकरण, तरतूदी आणि इतर संबंधित समस्यांवरील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय अशाच एका प्रकरणात मुंबईतील कोकण मर्कंटाइल को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. दुसरीकडे कोलकातास्थित समता को. ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -