ताजी बातमी ऑनलाइन टीम
राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात व्यासपीठावर येताना मला
अग्निशमन दलाचा बंब दिसला
इतकी काही आग नाही लावणार
राज ठाकरे : ‘नरेंद्र मोदी या देशात समान नागरी कायदा आणा’
गुडीपाडव्याच्या सभेत भोंग्याचा मुद्दा उपस्थित करून राजकीय वातावरणात भोंगा लावून सोडलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातून उत्तर सभेतून प्रत्युत्तर दिले. त्यांनी सुरुवातीलाच शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत भाषणाची दिशा स्पष्ट केली.
ते म्हणाले की, पोलीसांचा दुपारी फोन आला होता, माझ्या ताफ्याला कोणीतरी येणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं मात्र शरद पवार यांच्या घरी जाणार हे माहीत नव्हतं. गुडीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी अकलेलचे तारे तोडले, त्यानंतर उत्तर देणं गरजेचं आहे. मात्र मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायच नव्हतं कारण काही पत्रकार काही पक्षाला बांधील आहेत ते पण शिरतात आणि मूळ विषय बाजूला राहतो.
गेल्या निवडणुकीच्या वेळी बहुमत आल्यानंतरही तुम्ही नागरिकांची प्रतारणा केली. नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे बोललो. ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला ही खोटी अफवा पसरवल्याचा आरोप त्यांनी केला.
दुपारी मला पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला
की आपण किती वाजता निघणार आहात
काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार सांगितलं
आम्ही त्यांना पकडून तुमचं निघायचं टायमिंग कळालं की
माझ्या ताफ्याला अडवणार हे पोलिसांना कळलं पण पवारांच्या घरावरचे आंदोलन इंटेलिजन्सला नाही कळलं
गुढी पाडव्याची सभा झाल्यावर अनेकांनी तारे तोडले
अनेकांनी तारे तोडले त्याचं उत्तर तर द्यायला पाहिजे
पत्रकार परिषद घेतली असती तर विषय
भरकलटला असता
म्हणून ठाण्याल सभा घेत आहोत
वाट्टेल ते बोलत होते अनेकजण मी स्वदेश चित्रपट पहायाला गेलो मी त्याला म्हटलं असा कुठे चित्रपट असतो का मी आधी लगान बघितल्यामुळे मी तसं बोललो गुढी पाडव्याला अनेकजण त्यांचं भाषण घेऊन आले होते तीन वर्षांपूर्वी मोदींवर बोललो होतो आता पण बोलायची अपेक्षा करत होते तेव्हा बोललो आता नाही बोललो, भविष्यात वेळ आली तर बोलेन
मला तुमचेही वाभाडे काढायचे आहेत.
लाईव्ह तुमच्या पर्यंत पोचवत आहोत..