Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्रसलग चार दिवस सुट्टीमुळे पर्यटकांची पावले समुद्रकिनाऱ्याकडे

सलग चार दिवस सुट्टीमुळे पर्यटकांची पावले समुद्रकिनाऱ्याकडे

शालेय विद्यार्थ्यांच्या संपलेल्या परीक्षा व सलग चार दिवस जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे चार दिवस पर्यटकांसह चाकरमान्यांचे पायही जिल्ह्याकडे वळू लागले आहेत. गणपतीपुळे, गुहागर, दापोलीकडे पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता गृहित धरुन हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांकडे सुमारे75 टक्क्यांहून अधिक बुकिंग झाले आहे.

गुरुवारी, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महावीर जयंती, 15 रोजी गुड फ्रायडे आणि त्याला जोडून आलेला शनिवार व रविवार या सुट्ट्यांमुळे नागरिकांनी पर्यटनाला पसंती दिली आहे. गणपतीपुळे, गुहागरमधील वेळणेश्वर या समुद्रकिनारे लाभलेल्या धार्मिक पर्यटनस्थळांकडे पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचे पाय मोठ्या प्रमाणात वळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -