Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडापराभवाचा झटका त्‍यापाठाेपाठ रोहित शर्माला लाखो रुपयांचा दंड!

पराभवाचा झटका त्‍यापाठाेपाठ रोहित शर्माला लाखो रुपयांचा दंड!

आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सला अजूनही विजय मिळवता आलेला नाही. यंदाच्या हंगामात पाच सामने खेळून पाचही सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला. बुधवारी मुंबई इंडियन्स विरूध्द पंजाब किंग्ज यांच्यात सामना झाला. पंजाबने मुंबईला 199 धावांचे लक्ष्य दिले होते, पण ते ते गाठू शकले नाही आणि सामना १२ धावांनी गमावला. आता स्पर्धेत आपले अस्तिव टिकवण्यासाठी मुंबई इंडियन्सला उरलेल्या नऊपैकी आठ सामने जिंकावे लागतील.

पराभवानंतर रोहितचे लाखोंचे नुकसान
पराभवानंतर मुंबई इंडियन्स आणि कर्णधार रोहित शर्मा यांचे आर्थिक नुकसान झाले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटसाठी २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सच्या उर्वरित खेळाडूंना 6 लाख किंवा २५ टक्के मॅच फी दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सचा रस्ता खडतर
अयपीएलचा ५ वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सची ह्या हंगामात सुरूवात खूपच खराब झाली. मुंबई इंडियन्सला ५ पैकी ५ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. स्पर्धेत टिकण्यासाठी मुंबई इंडियन्सला आता नऊपैकी आठ सामने जिंकावे लागतील. बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाबने मुंबईला १९९ धावांचे लक्ष्य दिले होते, पण ते ते गाठू शकले नाही आणि सामना १२ धावांनी गमावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -