सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप गोडबोले या सगळ्या कटात सूत्रधार म्हणून काम पाहत होता. त्याला आज कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी आंदोलकांनी केलेल्या कथित हल्ला केल्या प्रकरणी नागपुरातून अटक करण्यात आलेल्या संदीप गोडबोलेला मुंबईतील कोर्टाच्या दंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरूनच पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी धडकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार सदावर्तेविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही करण्यात आली होती. तर पवारांच्या
तर पवारांच्या घरावरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शनही उघड झालं आहे. नागपुरातील एसटी कर्मचारी संदीप गोडबोलेला मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. गोडबोले महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात यांत्रिक पदावर कार्यरत असून पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी तो सदावर्तेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.
पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी तो सदावर्तेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. गोडबोले आमदार निवासमध्ये थांबला सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप गोडबोले या सगळ्या कटात सूत्रधार म्हणून काम पाहत होता. त्याला आज कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. गोडबोले आमदार निवासमध्ये थांबला होता. त्याने कोर्टासमोर स्वतः हे मान्य केलं आहे. कोणत्या आमदाराच्या ओळखीवरून तो आमदार निवासला थांबला हे तपासायच आहे चौकशी केली जाईल, असंही वकिलांनी सांगितलं.