Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रNCB ची मोठी कारवाई, 24 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त!

NCB ची मोठी कारवाई, 24 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त!

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. एका परदेशी व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे. या व्यक्तीकडून 3.98 किलो हेरॉइन जप्त केले आहे. ही व्यक्ती दक्षिण अफ्रिकेची असून मुंबईमध्ये हेरॉइनचा साठा घेऊन आली होती. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये 24 कोटी रुपये इतकी किंमत आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी (NCB Officers) पीटीआयला याबाबची माहिती दिली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘मंगळवारी ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये दक्षिण आफ्रिकन व्यक्तीला एनसीबीने मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करताना रंगेहाथ पकडले. ही व्यक्ती जोहान्सबर्ग येथून मुंबईत आली होती. लाला रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये या व्यक्तीने हे हेरॉइन आणले होते. एनसीबी मुंबई झोनच्या पथकाने खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने आणलेल्या ट्रॉली बॅगमध्ये हेरॉइनच्या एकूण चार पिशव्या सापडल्या. एनसीबीच्या पथकाने या व्यक्तीच्या बॅगची तपासणी केली असता त्याच्या बॅगेमध्ये आमली पदार्थांच्या चार पिशव्या आढळून आल्या. या पिशव्या आरोपीने बॅगमध्ये एका गुप्त कप्प्यामध्ये लपवल्या होत्या असे एनसीबीने जारी केलेल्या परीपत्रकात सांगितले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी बॅगाचा पुढचा भाग तोडल्यानंतर त्यात या पिशव्या सापडल्या. एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मागच्या वर्षी 2021मध्ये एनसीबीने दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका महिलेला अटक केली होती. या महिलेला सुद्धा मुंबई एअरपोर्टवरुन अटक करण्यात आली होती. तिच्याकडून 3.9 किलोचे हेरॉइन जप्त करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -