Monday, February 24, 2025
Homeक्रीडाJonty Rhodes : मुंबईला धुळ चारल्यानंतर पंजाबचे ‘जॉन्टी’ सचिन तेंडुलकर समोर नतमस्तक

Jonty Rhodes : मुंबईला धुळ चारल्यानंतर पंजाबचे ‘जॉन्टी’ सचिन तेंडुलकर समोर नतमस्तक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये बुधवारी (दि. 13) मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात चुरशीचा सामना झाला. पंजाब किंग्जने हा सामना जिंकला आणि मुंबई इंडियन्सला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यानंतर एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.



सामन्यानंतर पंजाब किंग्ज संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी रॉड्स (Jonty Rhodes) यांनी मुंबई इंडियन्सचे मार्गदर्शक सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली. या भेटीच्या सुरुवातीलाच रॉड्स मास्टर ब्लास्टर यांच्याविषयी आदर व्यक्त करत त्यांच्यासमोर नतमस्तक झाला. हा क्षण खूप्च भारावलेला होता. जॉन्टी रोड्सने सचिन तेंडुलकरच्या पायाला स्पर्श केला, पण क्षणार्धात सचिन यांनी त्याला असे करण्यापासून रोखले. दोन दिग्गजांमधील हे भावनिक दृश्य चांगलेच व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकर मुंबई संघाचा मेंटोर आहे. सामना संपल्यानंतर तो पंजाब संघातील सर्व सदस्यांशी एक एक करून हस्तांदोलन करत होता. पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी त्यांनी थोडा वेळ चर्चा केली. त्यानंतर ते जाँटी रोड्सकडे (Jonty Rhodes) वळले. त्याचवेळी रोड्स यांनी सचिन यांच्याशी हस्तांदोलन करण्याऐवजी खाली वाकून पाया पडू लागले. मात्र, सचिन यांनी त्यांना लगेच थांबवले आणि मग दोन्ही खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत पुढे सरसावले.



न्टी (Jonty Rhodes) यांची गणना जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. ते दक्षिण आफ्रिकेचे हुशार आणि चपळ खेळाडू होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरविरुद्ध अनेक सामने खेळले आहेत. जॉन्टी यापूर्वी मुंबई इंडियन्ससोबत होते. त्यामुळे त्यांचे सचिन यांच्यासोबत उत्तम बाँडिंग आहे. 2017 मध्ये जॉन्टी यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडली. ते सध्या पंजाब संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. तर सचिन तेंडुलकर मुंबई संघाचे मार्गदर्शक.

दुसरीकडे, कालच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 198 धावा केल्या. पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने शानदार फलंदाजी करत 52 धावांची खेळी केली. 199 च्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 186 धावा करता आल्या.

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा हा सलग पाचवा पराभव आहे. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्ससमोर आव्हान आहे की ते आता स्पर्धेत कसे पुनरागमन करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -