आज, शुक्रवार 15 एप्रिल, सकाळी 9:45 पर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केट 2.01% खाली आहे. ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप पुन्हा एकदा 51.88 टिलियनवर आला आहे. Bitcoin आणि Ethereum या दोन्ही प्रमुख करन्सी खाली आल्या आहेत. Bitcoin ची किंमत सध्या 40 हजार डॉलरच्या वर असली तरी XRP आणि Dogecoin ने गेल्या 24 तासांमध्ये अपट्रेंड
पाहिले आहे.
Coinmarketcap च्या डेटानुसार, शुक्रवारी बातमी लिहिण्याच्या वेळी, Bitcoin 2.90% खाली येऊन $40,195.32 वर ट्रेड करत आहे. Ethereum ची किंमत आज गेल्या 24 तासांमध्ये 2.51% घसरून $3,042.49 वर आली आहे. बातमी लिहिण्याच्या वेळी Bitcoin चे मार्केट वर्चस्व 40.7% आहे तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 19.5% आहे.



