Friday, November 14, 2025
Homeब्रेकिंगवरुणराजाची चांगली कृपा राहणार, यंदा 99 टक्के मोसमी पाऊस पडणार!

वरुणराजाची चांगली कृपा राहणार, यंदा 99 टक्के मोसमी पाऊस पडणार!

उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालल्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. एप्रिल महिन्यातच इतके तापमान वाढले आहे की मे महिन्यामध्ये आणखी किती कडक उन्हाळा असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी वरुणराजाची चांगली कृपा राहणार आहे. र्नैऋत्य मोसमी पावसाच्या थंडगार सरीचा पहिला अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार देशात यावर्षी जून ते सप्टेंबर या हंगामाच्या कालावधीत मोसमी पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. या कालावधीमध्ये सरासरीच्या तुलनेत 99 टक्के पाऊस पडणार आहे.

भारतीय हवामान विभागाने गुरुवारी मोसमी पावसाचा पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर केला आहे. पुढील सुधारित आणि दुसऱ्या टप्प्यातील अंदाज मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येईल. त्यानंतर नव्या धोरणानुसार हंगामातील प्रत्येक महिन्याचा अंदाज जाहीर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यासाठी हवामान विभागाकडून एप्रिलच्या सुरुवातीच्या काळातील वातावरणाच्या स्थितीचा आधार घेण्यात आला आहे.

तसंच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातल्याप्रमाणे महाराष्ट्रातही पावसाची (Maharashtra Rain) स्थिती चांगली राहणार आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मोसमी पाऊस तुरळक भाग वगळता जवळपास सर्वत्र सरासरी पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. त्यामध्ये मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, औरंगाबादच्या काही भागांचा समावेश आहे.

मोसमी पावसाला पूरक ठरणारा हिंद महासागरातील लानिना हा घटक संपूर्ण मोसमात सक्रिय राहणार आहे. द्विपकल्पीय भारताच्या उत्तरेकडील भाग आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी, हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांत सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य, उत्तर भारत आणि दक्षिण द्विपकल्पाच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी सामान्य ते सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -