Thursday, June 4, 2026
Homeराजकीय घडामोडीराज ठाकरेंच्या 'त्या' भुमिकेनंतर मुस्लीम कार्यकर्ते नाराज, 35 जणांनी दिला मनसेचा राजीनामा

राज ठाकरेंच्या ‘त्या’ भुमिकेनंतर मुस्लीम कार्यकर्ते नाराज, 35 जणांनी दिला मनसेचा राजीनामा

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची मुंबईमध्ये सभा झाली होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मशिदिबाहेर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत देखील राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम होते. आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे पडसाद उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या मशिदिबाहेरील भोंग्यांच्या वक्तव्यावरून पक्षातील मुस्लीम कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई आणि मराठवाड्यातील 35 मनसे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मनसेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. मनविसे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज पी. खान यांच्यासोबत 35 जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अनेक मुस्लीम कार्यकर्ते मनसेला जोडले गेलेले आहेत. मात्र राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर ते पक्षावर नाराज असल्याचे समोर येत आहे.

फिरोज खान यांचा राजीनामा
मनविसे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज पी. खान यांनी देखील राजीनामा दिला आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून मनसेसोबत काम करत आहे. मात्र राज साहेब ठाकरे यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे काम करणं कठीण झाले आहे. ज्या कुटुंबाने मला तुमच्यासोबत काम करण्याची प्रेरणा दिली, मात्र आता त्यांच्याकडूनच विरोध होत आहे. मी एक मनसेचा सामान्य कार्यकर्ता आहे, अनेक आंदोलनात सहभागी झालो. मात्र बदललेल्या भूमिकेमुळे मला राजीनामा द्यावा लागत आहे. मला अशा आहे की, तुम्ही राज्यासाठी आणि मराठी बांधवांसाठी काम करत राहाल. माझ्या राजीनाम्याचा स्वीकार करावा असे फिरोज खान यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -