गेल्या काही आठवड्यांत भारतातील खाद्यतेलाच्या किंमतीत किंचित नरमाई दिसून आली आहे. मात्र, यादरम्यान, एक नवीन घटना समोर आली आहे, ज्यामुळे भारतातील खाद्यतेल आणि विशेष रिफाइंड तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ होऊ शकेल. आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसू शकेल. देशात नुकतेच पेट्रोल-डिझेल, दूध, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ होत असताना, खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढू शकतील.
त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमती वाढू शकतील तज्ज्ञांच्या मते, इंडोनेशियातील पाम तेलाच्या संकटामुळे भारतात खाद्यतेलामध्ये तेजी येऊ शकते. हे एक अतिशय वेगळ्या प्रकारचे संकट आहे, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठ्या उत्पादक आणि निर्यात करणाऱ्या देशांपैकी एक असलेल्या इंडोनेशियामध्ये पाम तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा इतका मोठा आहे की, इंडोनेशियन सरकारला किंमत नियंत्रित करण्यासाठी अनेक पावले उचलावी लागली आहेत. यामध्ये किंमत नियंत्रण आणि निर्यातीशी संबंधित काही पायऱ्यांचा समावेश आहे.
इंडोनेशियन सरकार कठोर निर्णय घेणार देशांतर्गत पातळीवर किंमत नियंत्रणासोबतच
सरकारने निर्यातदारांसाठीही नियम कडक केले गेले आहेत. सरकारने निर्यातदारांना देशांतर्गत बाजारात नियोजित शिपमेंटपैकी 20 टक्के विक्री करणे बंधनकारक केले आहे.
एका वर्षात दर 57% वाढला मार्च 2021 मध्ये इंडोनेशियामध्ये एक लिटर अंडेड सायंपाकाच्या तेलाची किंमत 14,000 इंडोनेशियन रुपये होती. मार्च 2022 मध्ये है बाडून 22,000 इंडोनेशिया झाले. अशाप्रकारे एका वर्षात देशातील खाम्तेलाच्या दरात 57 टक्के वाद झाली आहे. 7 फेब्रुवारी रोजी इंडोनेशियन सरकारने किरकोळ किंमतींसाठी कमाल मर्यादा निश्चित केली होती.