दक्षिण आफ्रीकेच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने करोना ओमिक्रोनचे सबव्हेरीयंट बीए.४ आणि बीए.५ देशात करोनाची पाचवी लाट आणू शकतात असा इशारा दिला आहे. या विभागाचे प्रवक्ते फोस्टर मोईले म्हणाले, जगभरात ओमिक्रोनचे पाच उपप्रकार आढळले आहेत. त्यातील बीए.४ आणि बीए.५ हे फारसे गंभीर नसले तरी जगभरात करोनाची पाचवी लाट आणू शकतील का याविषयी सांगता येणार नाही. आम्ही देशात मे महिन्यात करोनाची पाचवी लाट येईल असे गृहीत धरून काम करत आहोत. पण त्यामुळे फार चिंता करण्यासारखी परिस्थिती येणार नाही.
दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क आणि युके याठिकाणी ओमिक्रोनचे उपप्रकार आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेत जीनोमिक रुपात करोना केसेस वाढत आहेत पण मृत्यू संख्या वाढलेली नाही. येथे ओमिक्रोनचे बीए.४ आणि बीए.५ सापडले आहेत. संक्रामक रोग तज्ञ अब्दुल करीम यांच्या म्हणण्यानुसार ओमिक्रोनची जागा घेणारी व्हेरीयंट अतिशय वेगाने फैलावत आहेत. ही व्हेरीयंट फार लक्ष देण्यासारखी नाहीत कि खरोखर गंभीर आहेत हे अजून स्पष्ट नाही. प्रत्येक नवे व्हेरीयंट अतिशय वेगाने फैलावते आहे.
करोनाच्या बीटा, डेल्टा ने दक्षिण आफ्रिकेत दुसरी आणि तिसरी लाट अधिक घातक ठरली होती. पण ओमिक्रोन वेगाने फैलावला तरी संक्रमिताना हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण फार कमी आहे.