Thursday, November 7, 2024
Homeक्रीडापुजारा-‍रहाणे यांनी भारताचा डाव सावरला Ind vs Eng 2nd test:

पुजारा-‍रहाणे यांनी भारताचा डाव सावरला Ind vs Eng 2nd test:

Ind Vs Eng 2nd Test दुसर्‍या कसाेटीच्‍या दुसरा डावात भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीरांच्‍या अपयशानंतर कर्णधार विराट कोहली देखील अवघ्‍या २० धावांवर तंबूत परतला. अशा आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीत चेतेश्‍वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. ५७ षटकात भारताने आपल्‍या दुसर्‍या डावात ५७ षटकांत ३ बाद ११८ धावा केल्‍या आहेत. ९१ धावांची आघाडी घेतली आहे.

चाैथ्‍या दिवशी दुसर्‍या डावाची सुरुवात भारताने सावध केली हाेती . मात्र सलामीवीरांनी निराशा केली.केएल राहुल केवळ पाच धावांवर बाद झ्राला. तर त्‍याला मार्क वूडने बाद केले. तर रोहित शर्मा यालाही मार्कनेच तंबुत धाडले.



यानंतर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजार डावा आकार देतील, अशी आशा हाेती. मात्र सॅम करनने कर्णधार विराट कोहली याला विकेटकीपर बटलरकडे झेल देणे भाग पाडले.

पहिल्‍या सत्रात इंग्‍लंडचे वर्चस्‍व राहिले. लंचपर्यंत भारताने ३ गडी गमावत ५६ धावा केल्‍या आहेत.

इंग्‍लंडच्‍या मार्क वुडने दोन तर सॅम करन याने एक बळी घेतला.अजिंक्‍य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची जोडी मैदानात आहे.



कर्णधार ज्यो रूटच्या नाबाद 180 धावांच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात तिसर्‍या दिवसअखेरीस 27 धावांची नाममात्र आघाडी घेतली हाेती. त्यांचा पहिला डाव 391 धावांवर आटोपला.Ind Vs Eng 2nd Test चौथ्‍या दिवशी भारताच्‍या सलामीवीरांनी संयमाने सुरुवात केली आहे. ७ षटकांचा खेळ संपल्‍यानंतर भारत पहिल्‍या डावात विनाबाद १७ धावा केल्‍या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -