Friday, June 21, 2024
Homenewsआजपासून महाराष्ट्रात निर्बंध शिथील होण्याची अंमलबजावणी होणार. वाचा काय सुरु, काय बंद

आजपासून महाराष्ट्रात निर्बंध शिथील होण्याची अंमलबजावणी होणार. वाचा काय सुरु, काय बंद

आज सोमवारपासून महाराष्ट्रात निर्बंध शिथील होण्याची अंमलबजावणी होणार आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकानं रात्री दहावाजेपर्यंत उघडी ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना आणि या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासोबतच खाजगी कार्यालये, लोकल ट्रेन यासाठीही सूट देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना महाराष्ट्र अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे करताना जर रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन करणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

मंगलकार्यालयांना सूट
खुल्या जागेत जे विवाह सोहळा होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉल मधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे. नियमांचे पालन करणार नाही त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.

खाजगी कार्यालयात 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी
खाजगी कार्यालयात एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये काम करता येईल. खाजगी कार्यालयातील कर्मचारी यांचे दोन डोस लस झालेली आहे त्यांना शंभर टक्के क्षमतेने कार्यालय सुरू राहतील.

सिनेमागृह, मंदिरे पुढील आदेश येईपर्यंत बंद
सिनेमागृह आणि नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. शॉपिंग मॉल 10 वाजेपर्यंत सुरु राहतील मात्र त्या ठिकाणी जाणारे आहेत त्यांचे दोन डोस झालेले असावेत. कार्यालयात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रथम लसीकरण देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी युनिव्हर्सल पास!
लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात येणार असून, लवकरच ती सुरु करण्यात येणार आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामांन्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.

लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन प्रवासासाठी विशिष्ट पास देण्यात येणार आहेत. या पासवर क्यूआर कोड असणार आहे. हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जाईल. हा पास लोकल ट्रेनसोबतच मेट्रो, मोनोरेल त्याचप्रमाणे मॉल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालू शकणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -