Friday, June 21, 2024
Homeआरोग्यविषयकडेल्टा प्लस कोरोनाचे कोल्हापुरात ६ रुग्ण

डेल्टा प्लस कोरोनाचे कोल्हापुरात ६ रुग्ण

गेल्या काही दिवसांत कोल्हापुरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी येत असतानाच डेल्टा प्लस या कोरोनाच्या व्हॅरियंटचे ६ रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. प्रशासनाने याला दुजारा दिला असून नागरिकांना घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.कोल्हापूर शहरात 3, हातकणंगले मध्ये 2 व निगवे दुमाला मध्ये 1 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरात सापडलेल्या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण विचारे माळ इथला असून दोन रुग्ण सानेगुरुजी वसाहतींमधील आहेत.जिल्ह्यात डेल्टा प्लस रुग्ण सापडल्याने प्रशासन गतिमान झाले असून सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, “जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नमुने तपासण्यासाठी पाठवले होते. विषाणूत काही बदल झाला आहे का समजावे यासाठी हे नमुने पाठवले होते.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -