भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL सध्या स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनमुळे चर्चेत आहे. कंपनीने आला आपले लॉन्ग टर्म व्हॅलिडिटी असलेले रिचार्ज प्लॅन्ससोबत शानदार ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार, ग्राहकांना 60 दिवस ते 90 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळत आहे. चला तर मग जाणून घेवूया प्लॅनची किंमत आणि बेनेफिट्सबाबत.
BSNL आपल्या लॉन्ग-टर्म व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनसोबत एक्स्ट्रा व्हॅलिडिटी ऑफर देत आहे. या प्लॅनची किंमत 2,999 रुपये आणि 2,399 रुपये आहे. BSNL चे दोन्ही प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. कंपनीच्या लेटेस्ट ऑफरनुसार, दोन्ही प्लॅन्सवर क्रमश: 90 आणि 60 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळत आहे.
BSNL Rs 2,399 and Rs 2,999 Offer
2,399 रुपये मुल्य असलेल्या प्लॅनबाबत सांगायचे झाल्यास या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवस आहे. ऑफरनुसार, ग्राहकांना 60 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळेल. याचा अर्थ असा की, ग्राहकाला 365 ऐवजी एकूण 425 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.
दुसरा प्लॅनचे मुल्य 2,999 रुपये आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी देखील 365 दिवसांची आहे. ऑफरनुसार ग्राहकाला 90 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळेल. म्हणजेच या हा प्लॅन रिचार्ज केल्यास एकूण 455 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. ही ऑफर केवळ 29 जूनपर्यंतच राहिल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
BSNL Rs 2,399 and Rs 2,999 Recharge plans benefits
BSNL च्या 2,399 रुपयांच्या पॅकमध्ये यूजर्सला अनलिमिटिड कॉलिंग, सोबतच डेली 2GB डेटा आणि 100 एसएमएस फ्री मिळतील. या प्लॅनमध्ये EROS Now च्या रुपात यूजर्सला OTT सब्सक्रिप्शन देखील मिळेल. तर दुसरा 2,999 रुपये मुल्य असलेल्या पॅकमध्ये दररोज 2GB च्या ऐवजी 3GB डेटा मिळेल. सोबतच कॉलिंग आणि एसएमएल बेनेफिट 2,399 रुपये मुल्य असलेल्या प्लॅनप्रमाणेच मिळतील.