Tuesday, June 3, 2025
Homeराजकीय घडामोडीहनुमान जयंतीनिमित्त देशभरातील हिंदू बांधवांना राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

हनुमान जयंतीनिमित्त देशभरातील हिंदू बांधवांना राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

मशिदींवरील भोंग्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता या विषयावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. शिवाय, जर मशिदींवरल भोंगे काढले नाहीत, तर मशिदींसमोर सामूहिक हनुमान चालीसा पठण केले जाईल, असा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवरच राज ठाकरे यांनी आज हनुमान जयंतीनिमित्त एक ट्वीट करून विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

देशभरातील तमाम हिंदू बांधवांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! अशा शब्दांमध्ये देशभरातील हिंदू बांधवांना राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हिंदुत्वाच्या मुद्य्यावर राज ठाकरे हे आक्रमकपणे जाहीर भूमिका मांडताना दिसत आहेत. शिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यातच राज ठाकरेंच्या हस्ते आज हनुमान जयंती निमित्त पुण्यात महाआरती होणार आहे. ही महाआरती म्हणजे राज ठाकरेंच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजता ही महाआरती होणार आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे असा करण्यात आल्यामुळे अधिकच चर्चा रंगलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -