Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगलोन हवंय? चिंता सोडा, SBI कडून ग्राहकांसाठी खास ऑफर..!

लोन हवंय? चिंता सोडा, SBI कडून ग्राहकांसाठी खास ऑफर..!

सध्या देशात पेट्रोल, डिझेलचे दर  गगनाला भिडले आहेत. इंधनाच्या किमती सातत्याने वाढतच आहेत. अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल, डिझेल सारख्या इंधनावर वाहन चालवणे बजेटच्या बाहेर गेले आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही इलेक्ट्रिक वाहन (electric vehicles) खरेदीचा विचार करू शकता. इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे अनेक फायदे आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणाला तर आळा बसतोच सोबतच इंधनाच्या खर्चामध्ये देखील मोठी बचत होते. मात्र इलेक्ट्रिक वाहने हे तुलनेने सध्या पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा महाग आहेत. मात्र तुम्हाला जर इलेक्ट्रिक वाहनाची खरेदी करायची असेल तर काळजी करू नका, सध्या विविध बँका इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी ऑफर देत आहेत. अशीच एक ऑफर सध्या आपल्या ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) कडून देण्यात येत आहे. या ऑफरचा फायदा असा की, या ऑफरमुळे कमी ईएमआयमध्ये तुमचे इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. चला तर जाणून घेऊयात बँकेच्या या ऑफरबाबत.

काय आहे ऑफर?

एसबीआयकडून इलेट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देण्यात आली आहे. त्यांना वाहन कर्जावर 20 बेसीस पॉइंटची अतिरिक्त सूट मिळणार आहे. सोबतच कर्जाची संपूर्ण प्रोसेसिंग फी देखील माफ करण्यात येणार आहे. तसचे जर तुम्हाला कमीत कमी ईएमआयचे हफ्ते भरायचे असतील तर बँक तुम्हाला आठ वर्षांत संपूर्ण कर्जफेडीची सुविधा देखील उपलब्ध करून देत आहे. तुम्ही जर लवकरात लवकर ईएमआयचे हफ्ते भरले तर कर्जावर भराव्या लागणाऱ्या व्याजात देखील बचत होऊ शकते. तुम्ही आठ वर्षापूर्वी देखील बँकेचे संपूर्ण लोन परतफेड करू शकता.

लोनसाठी काय आहेत अटी?

एसबीआयकडून इलेक्ट्रिक वाहनावर लोन घेण्यासाठी संबंधित कर्जदाराचे वय कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 67 वर्षांपर्यंत असावे. एसबीआयकडून हे लोन व्यवसायिक, सरकारी कर्मचारी किंवा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफर करण्यात येत आहे. थोडक्यात काय तर तुमचा पगार हा बँकेच्या नियमात बसायला हवा तरच तुम्हाला लोन मिळू शकते. ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखांच्या वर आहे, असे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकता. बँकेने विचारणा केलेल्या आवश्यक डॉक्युमेंटची पुर्तता केल्यानंतर तुम्हाला इलक्ट्रिक वाहन खरेदीसाठी कर्ज मिळू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -