Sunday, July 27, 2025
Homeतंत्रज्ञानFlipkart TV Sale सुरू, 7,499 रुपयांना मिळतोय स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या 32-इंचाच्या...

Flipkart TV Sale सुरू, 7,499 रुपयांना मिळतोय स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या 32-इंचाच्या टीव्हीवरील ऑफर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

ऑनलाइन शॉपिंग साइटवर दररोज अनेक उत्तम ऑफर्स येत राहतात आणि या ऑफरचा फायदा घेऊन अनेकांना कमी पैशात सर्वोत्तम उत्पादन खरेदी करण्याची संधी मिळते. आता फ्लिपकार्टवर टीव्ही डेज सेल (Flipkart TV Sale) सुरू झाला आहे. या सेलमध्ये (Flipkart Sale) ग्राहकांना एकापेक्षा जास्त ब्रँडवर मोठी सवलत देण्यात येत आहे. शुक्रवारी 15 एप्रिलपासून सुरू झालेला हा सेल 19 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये तुम्ही एक्सचेंज ऑफर, EMI आणि बँक डिस्काउंटचाही (Smart TV offers) लाभ घेऊ शकता. चला तर मग या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या (Bank Discounts) ऑफर्सविषयी जाणून घेऊया…



किंमत 7,499 रुपयांपासून सुरू
तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही 7,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत टीव्ही खरेदी करू इच्छित असाल तर या सेलमध्ये तुम्हाला तशी संधी मिळत आहे. कोडॅकचा 24 इंचाचा टीव्ही या बजेट रेंजमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही दुसरा ब्रँड थॉमसनचा 24-इंचाचा टीव्ही देखील फक्त 7,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.



32-इंचचा टीव्ही
MarQ ब्रँडचा 32-इंचाचा टीव्ही 8,999 रुपयांना उपलब्ध आहे. त्याच साइजमध्ये तुम्ही थॉमसनचा (Thomson) HD Ready टीव्ही खरेदी करून शकता. त्याची किंमत 8,999 रुपये आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -