ताजी बातमी ऑनलाइन टीम
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आज दिल्ली कॅपिटल्सचा (RCB VS DC) 16 धावांनी पराभव केला. RCB चा यंदाच्या सीजनमधील हा चौथा विजय आहे. दिल्लीचा तिसरा पराभव आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) नाबाद 66, ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) 55 शाहबाज अहमद नाबाद 32 आणि जोश हेझलवूड यांनी आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 189 धावा केल्या.
दिल्लीला विजयासाठी 190 धावांच लक्ष्य दिलं होतं. पण त्यांनी निर्धारित 20 षटकात सात बाद 173 धावा केल्या. RCB चा मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभव केला होता. आजच्या विजयाने त्यांनी जोरदार कमबॅक केलं आहे.