Wednesday, December 17, 2025
Homeसांगलीदोन ट्रकच्या अपघातात एक ठार

दोन ट्रकच्या अपघातात एक ठार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नेर्ले. ता. वाळवा येथे आशियाई महामार्गावर रानवारा हॉटेल नजीक दोन ट्रकच्या भीषण अपघातात एक जण ठार झाला आहे. रमेश शामराव पाटील (वय. ३९) रा. बिद्री ता. कागल जि. कोल्हापूर असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली असून कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी, नेर्ले ता. वाळवा येथे कोल्हापूर च्या दिशेने जाणाऱ्या आशियाई महामार्गावर सदा पाटील मळ्यासमोर रानवारा हॉटेल नजीक बगॅस घेऊन जाणाऱ्या ट्रक Mh09 FL 2170 चे टायर फुटल्याने दुभाजकाच्या शेजारी उभा केला होता. मात्र कोल्हापूरच्या दिशेने पशु खाद्य घेऊन जाणाऱ्या ट्रक MH09 EM 3829 चालकाच्या हे लक्षात न आल्याने उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली होती. यामध्ये पाठीमागील ट्रक चालक रमेश शामराव पाटील (वय. ३९) रा. बिद्री ता. कागल जि. कोल्हापूर ठार झाला असून दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कासेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी होऊन वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -