Thursday, August 7, 2025
Homeसांगलीस्वाभिमानीच्या ‘बळीराजाचा हुंकार' यात्रेस देवराष्ट्रेतून प्रारंभ

स्वाभिमानीच्या ‘बळीराजाचा हुंकार’ यात्रेस देवराष्ट्रेतून प्रारंभ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राजू शेट्टी यांची केद्र-राज्य सरकारवर टीका

धरणासाठी शेतकर्यांनी जमिनी देऊनही शेतकऱ्यांना वीज देताना मात्र अन्याय केला जात आहे. शेतीला रात्रीचा वीजपुरवठा केला जात असल्याने अनेक शेतकरी हिंस्त्र प्राण्याचे बळी ठरत आहेत. त्यामुळे शेतीला दिवसा वीज घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून यासाठी आपण हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे प्रतिपादन स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कले.



स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बळीराजाचा हुंकार यात्रेस देवराष्ट्र ता.कडेगाव येथे यशवंतरावांच्या पुतळ्यास अभिवादन करुन प्रारंभ झाला. यावेळी राजू शेट्टी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट आण्णा मोरे, जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेट्टी यांनी केद्र व राज्य सरकारवर विविध प्रश्नावरुन सडकून टीका केली. पिक हमीभाव, साखर धोरण, एफआरपी आदी प्रश्नांना हात घालत सरकारला जाब विचारला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -