Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रअश्लील फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्याची पत्नीला ऑफर

अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्याची पत्नीला ऑफर

पुण्यातील एका पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचे अश्लील फोटो काढून ते फोटो इन्स्ट्राग्रामवर टाकून पैसे कमवू, अशी घाणेरडी ऑफर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्यांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पती मजहर सय्यद, सासू नसरीन, सासरे इरकाम आणि दीर वसीम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत 29 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2020 ते 16 एप्रिल 2022 दरम्यान कोंढव्यात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजहर हा फिर्यादी यांचा पती असून, तो वारंवार फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यांना शिवीगाळ करून मारहाण करत होता. त्याने फिर्यादीचे अश्लील फोटोदेखील मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर आपला इतका खर्च होत असेल तर आपल्याला काही पैसे कमवावे लागतील, असे त्याने सांगितले. त्यावर त्याने तिला मी तुझे अश्लील फोटो इन्स्ट्राग्रामवर अपलोड करून आपण पैसे कमवू, असे सांगितले. त्याने जबरदस्तीने तिला प्रॉपर्टीच्या कागदावर सह्या कर, अन्यथा तलाक देईन, अशी धमकी दिली. तसेच इतर संशयित आरोपींनी लग्नात सामान दिले नाही म्हणून टोमणे मारले. तसेच फिर्यादी यांना मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -