Thursday, July 24, 2025
Homeकोल्हापूरज्येष्ठ नेते शरद पवार शनिवारी कोल्हापुरात

ज्येष्ठ नेते शरद पवार शनिवारी कोल्हापुरात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

तपोवन मैदानावर संवाद मेळावा; राष्ट्रवादीचे मंत्री, खासदार, आमदारांसह राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचा शुक्रवारी (दि. 23) कोल्हापुरात समारोप होणार आहे. या निमित्ताने तपोवन मैदानावर सायंकाळी 5 वाजता संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी मंत्री, खासदार, आमदार, नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही माहिती ग्रामविकास मंत्री हसन र यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.



राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात ताकद वाढावी, स्थानिक स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते या बळ देण्यासाठी परिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादीने नेते, मंत्री, पदाधिकारी राज्यभर राष्ट्रवादी परिवारातील स्थानिक पदाधिकारी, कार्यर्त्यांचा मेळावा, बैठका घेत संवाद साधत आहेत. बुधवारी कोल्हापूर जिल्हय़ातील संवाद यात्रेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभ केला. ते प्रत्येक तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी मेळावा घेऊन संवाद साधत आहेत. त्यांच्या अडचणी, प्रश्न आणि पक्षाविषयी असणारया मागण्या, सूचना समजावून घेत आहेत. त्याची कोल्हापूर जिल्हय़ातील यात्रा बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार अशा तीन दिवस चालणार असून शनिवारी या यात्रेचा समारोप होणार आहे.


तपोवन मैदानावर समारोप राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा समारोप शनिवार 23 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता येथील तपोवन मैदानावरील संवाद मेळाव्याने होणार आहे. यावेळी राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मंत्री, खासदार, आमदार, नेते यांचीही उपस्थिती असणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जलसंण्टा मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर मंत्रीह ^ उपस्थित राहणार आहेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -