ताजी बातमी ऑनलाईन टीम
व्याजाच्या पैशावरून सावकारांकडून दिल्या जात असलेल्या त्रासाला कंटाळून येथील एकावर घर सोडून परागंदा होण्याची वेळ आली. सावकारांनी त्याची पत्नी घरात असताना तेथे जात शिविगाळ, दमदाटी करत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सीताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी (रा. बारामती) व अळनुरे (पूर्ण नाव नाही, रा. परभणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. यातील बोरकर व थोरात यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली. भिगवण रस्त्यावर राहणाऱ्या एका महिलेने याबाबत फिर्याद दिली.