Thursday, February 6, 2025
Homeक्रीडाजगातील सर्वोत्तम मॅच फिनिशर असल्याचे धोनीने पुन्हा केले सिद्ध

जगातील सर्वोत्तम मॅच फिनिशर असल्याचे धोनीने पुन्हा केले सिद्ध

महेंद्र सिंह धोनीने पुन्हा एकदा तो जगातला सर्वोत्तम मॅच फिनिशर असल्याचे सिद्ध केले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात धोनीने त्याच्या स्टाईलने मॅच फिनिश करून चेन्नई संघाला हांगामातील दूसरा विजय मिळवून दिला. गुरुवारी रात्री खेळला चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन तगड्या संघांमध्ये झालेल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगनंतर मुंबईचं पारलं जड मानलं जात होतं. मात्र अखेरच्या षटकात (final over) विजयासाठी 17 धावा हव्या असताना धोनीने (MS Dhoni) धडाकेबाज फलंदाजी करत एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने चेन्नईला विजय मिळवून दिला. 

गुरुवारी रात्री खेळला चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन तगड्या संघांमध्ये झालेल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगनंतर मुंबईचं पारलं जड मानलं जात होतं. मात्र अखेरच्या षटकात (final over) विजयासाठी 17 धावा हव्या असताना धोनीने धडाकेबाज फलंदाजी करत एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने चेन्नईला विजय (Chennai victory) मिळवून दिला. तर मुंबईला सलग 7वा पराभव पचवावा लागला. आयपीएलच्या इतिहासात (History of the IPL) एखाद्या संघाला सलग सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्याची ही पहिलीच वेळ आहे.

या सामन्यात चेन्नईला विजयासाठी अखेरच्या षटकात 17 धावांची गरज होती. चेन्नईकडून क्रीजवर एका बाजूला मिस्‍टर फिनिशर एम एस धोनी होता तर दुसऱ्या बाजूला ड्वेन प्रिटोरियस होता. अखेरच्या षटकात कर्णधार रोहित शर्माने जयदेव उनादकटच्या हाता चेंडू दिला. जयदेवने पहिल्याच चेंडूवर प्रिटोरियसची विकेट घेतली. आता विजयासाठी 5 चेंडूत 17 धावांची गरज होती. त्यावेळी क्रीजवर ब्रोवो आला आणि त्याने एक धाव घेऊन धोनीला स्ट्राईक दिली. त्यानंतर तिसर्या चेंडूवर धोनीने उतुंग षटकार खेचला. आता विजयासाठी चेन्नईला 3 चेंडूत 10 धावांची आवश्यकता होती. धोनीने पुन्हा एक चौकार खेचला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर धोन धावा आणि शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून धोनीने चेन्नईला सामना जिंकून दिला. 

धोनीच्या या विजयानंतर चेन्नईचा खेळाडू रॉबिन उथप्पाने कूवर एक पोस्ट केली आहे. यात त्याने “माझ्यासाठी एक खास…200व्या गोड विजयासह! सॉलिड @chennaiipl! MSD ला स्टाइलमध्ये फिनिश करताना पाहून कधीच थकू शकत नाही. #Yellove #WhistlePodu” असे लिहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -