विविध ई-कॉमर्स कंपन्या आपल्या अनेक प्रोडक्टवर तगडा डिस्काउंट देत आहेत. अशातच फ्लिपकार्टने Realme कंपनीच्या एका मोबाईलवर जबरदस्त डिस्काउंट देत आपल्या ग्राहकांना आकर्षित केले आहे. फ्लिपकार्टवर चालू असलेल्या मंथ एंड मोबाईल फेस्ट सेलमध्ये Realme स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळत आहे. Realme कडे असे अनेक उत्तम फोन आहेत, ज्यांचे फीचर्स एकदम भारी आहेत. आणि हे स्मार्टफोन इतर कंपन्यांच्या तुलनेने कमी किमतीत उपलब्ध आहेत. आता तुम्हाला Realme 9i खूप स्वस्तात खरेदी करण्याची संधी आली आहे. 15,999 रुपयांचा स्मार्टफोन तुम्ही फक्त 449 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कसे, ते जाणून घ्या.
Realme 9i च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची लॉन्च किंमत 15,999 रुपये आहे, परंतु हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 12,999 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय, फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफर आहे, ज्यामुळे फोनची किंमत चांगलीच कमी होईल.
Realme 9i खरेदी करण्यासाठी, तुम्ही SBI आणि HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत थेट 11,999 रुपये होईल. Realme 9i वर 11,550 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन अदलाबदल केलात तर तुम्हाला खूप डिस्काउंट मिळू शकतो. एवढच नाही तर तुमच्या जुन्या स्मार्टफोनची कंडीशन चांगली असेल तर 11,550 रुपये डिस्काउंटही मिळेल. जर तुम्ही या दोन्ही ऑफर मिळवू शकलात तर फोनची किंमत 449 रुपये असेल. जो आपल्या सर्वसाधारणपणे एका महिन्याचा रिचार्ज असतो.
Realme 9i चे स्पेसिफिकेशन्स :-
• Realme 9i मध्ये 6.6 इंच FHD+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज, टच सँपलिंग रेट 180 हर्ट्ज, स्क्रीन टू बॉडी रेशियो 90.8 टक्के
• सेल्फीसाठी पंच-होल कटआउट
• फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
• फोन अँड्राइड 11 आधारित Realme UI 2.0 कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्सवर काम करतो.
• 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएचची बॅटरी