मागील दोन वर्षांत अनेकांनी आपली नोकरी गमावली. याशिवाय पगार कपातीचाही काहींना सामना करावा लागला. मात्र आता केंद्र सरकारच्या एका उपक्रमांतर्गत देशातील बेरोजगारांना कमाईची मोठी संधी देण्यासाठी भारतीय जनऔषधी केंद्र नावाचा एक उपक्रम केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे.
केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या गावात, शहरात जनऔषधी केंद्र सुरू करून चांगल्या कमाईची संधी देणार आहे. केंद्रांच्या माध्यमातून चांगल्या प्रतीची औषधे देशातील नागरिकांना स्वस्तात उपलब्ध करून दिली जाणार आहे. तुम्हालाही अर्ज करता येणार आहे. सध्या देखील प्रक्रिया चालू आहे.
केंद्र सरकार 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र उघडण्याची संधी देत आहे. जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी 406 जिल्ह्यांतील एकूण 3579 तालुक्यांमधून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
जनऔषधी केंद्रांची संख्या वाढल्यास नागरिकांना स्वस्तात औषधोपचार मिळण्यास मदत होणार आहे. 26 एप्रिल 2022 च्या ताज्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला भारतात जनऔषधी केंद्रांची संख्या 8718 एवढी आहे. मार्च 2024 पर्यंत ही जनऔषधी केंद्रांची संख्या वाढवून 10 हजार पर्यंत करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे.
इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज कसा करायचा..?
जर तुम्हालाही ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही janaushadhi.gov.in वर जाऊन Menu वर क्लिक करून PMBJP वर क्लिक करा. मग APPLY FOR KENDRA वर पुन्हा क्लिक करा आणि नवीन उघडलेल्या पेजवर खाली जाऊन Click here to Apply नावावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा. याशिवाय तुम्हाला या योजनेच्या तपशीलवार अटी व नियम पाहून मगच अर्ज करावा लागणार आहे. तसेच काही समस्या असल्यास तुम्ही 1800-180-8080 या नंबरवर मोफत संपर्क करू शकता.
जनऔषधी केंद्रांतर्गत 1616 औषधांचा, जवळपास 250 सर्जिकल उपकरणाचा यात समावेश होतो. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा तसेच काही आयुष उत्पादनांचा देखील समावेश जनऔषधी केंद्रामध्ये करण्यात आला आहे. ज्यामध्ये आयुष किट, बलरक्षा किट, आयुषच्या विविध प्रकारच्या 64 टॅबलेटचा यांचा समावेश करण्यात आला आहे.