Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यविषयकहे फळ उन्हाळ्यात देईल तुम्हाला थंडावा; जाणून घ्या, त्याच्या सेवनाचे फायदे

हे फळ उन्हाळ्यात देईल तुम्हाला थंडावा; जाणून घ्या, त्याच्या सेवनाचे फायदे

उन्हाचे रणरणते दिवस येऊ लागले की सरबत, उसाचा रस, दही आणि ताक पिण्याचा कल खूप असतो. या दिवसात कलिंगड खाणे खूप फायदेशीर ठरते. कलिंगड (Watermelon) खाल्याने शरीरातील पाण्याची उणीव भरुन निघते. उन्हाळ्यात घामाद्वारे मानवी शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणात निघून जाते. या पाण्याची उणीव कलिंगड सेवनाने भरुन येते. कारण या फळात ९५% पाणी असते. जाणून घेवूया त्याच्या सेवनाच्या फायदे..

सध्या या दिवसात रणरणतं ऊन आहे. दुपारच्या वेळेला घराच्या बाहेर पडला तर उन्हाच्या झळा जाणवतील. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असणे, डोळ्यांची जळजळ, तळहात आणि तळपायांची रखरख, पोटात दुखणे, पित्ताचे प्रमाण वाढणे असे बरेच आजार या दिवसात बऱ्याच लोकांना उमटतात. उष्माघाताचे प्रमाण तर खूप वाढते. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. तर यावर आपल्याला बरेच उपचार करता येतील. त्यापेैकी म्हणजे आपल्या खाण्यात कलिंगडचे प्रमाण वाढवणे. टरबूज खाण्याने आपल्याला बरेच फायदे होतात.

१) कलिंगड खाल्ल्याने शरिरातील पाण्याची कमतरता (Dehydration) असेल तर ती उणीव भरुन निघते.
२) तुम्हाला रक्तदाब, चक्कर येणे, तोंड कोरडे होणे या समस्यासवर कलिंगडचे सेवन फायदेशीर ठरते.
३) कलिंगडमध्ये सी व्हिटॅमिनचे (जीवनसत्व क) प्रमाण मुबलक असते. त्यामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
४) या फळातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियम किडनीला स्वस्थ ठेवते. त्यामूळे मुतखडा (किडनी स्टोन) होण्याची शक्यता कमी
असते.
५) पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि एमिनो अँसिड तत्त्व एकत्रितपणे शरीरातील नसांना स्वस्थ आणि मजबूत बनवितात.
६) कलिंगडचे सेवन वजन कमी होण्यासही मदत करते.
७) कलिंगडमधील बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ‘ए’ हे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.

८ ) केस आणि त्वचेसाठीही कलिंगड सेवन फायदेशीर ठरते

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -