कार्तिक आर्यन (Kartik Aryan) स्टारर ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलमध्ये कॉमेडी आणि हॉररचा जबरदस्त तडका पहायला मिळत आहे. अक्षय कुमारच्या भूल भुलैया चित्रपटाच्या कथेच्या बेसवरच भूल भुलैया 2 ची कथा दाखवण्यात आली आहे. 15 वर्षानंतर पुन्हा या घरात मंजुलीकाचे भूत परत येताना दाखवले आहे. यावेळी ते कियारा अडवाणीच्या शरीरात प्रवेश करेल असे ट्रेलरवरून लक्षात येते. ट्रेलवरून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकात आणखी वाढली आहे. येत्या 20 मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.
‘भूल भुलैया 2’ चित्रपटात कार्तिक आर्यनसह किराया अभिनेत्री अडवाणी आणि तब्बू देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलर लाँचच्या काही तास आधी कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनने भूल भुलैया 2 चे नवीन पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमुळे ट्रेलरची उत्सुकता आणखी वाढली होती. आता ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या अर्ध्या तासात ट्रेलरला 13 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
ट्रेलरची सुरुवात भूल भुलैयामधील प्रसिद्ध गाणं ‘आमी जे तुम्हारो’ने होताना होते. त्यानंतर चित्रपटाती अनेक घटनाक्रमांचा उलगडा आणि पात्रांची ओळख होते. कार्तिक आर्यनचा गळ्यात रुद्राक्षांची माळ, डोक्याला बांधलेला रुमाल, कुर्ता घातलेल्या कार्तिकचा जबरदस्त लूक पाहण्यासारखा आहे. याशिवाय अभिनेता राजपाल यादव आणि संजय मिश्रा यांच्या कॉमेडीची झलकही पाहायला मिळाली आहे. याशिवाय चित्रपटात परेश रावल, असरानी, मनोज जोशी आणि अंगद बेदी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटात तब्बू मंजुलीकाच्या रहस्स्याचा उलगडा करताना दिसत आहे. तर ट्रेलरच्या शेवटी कियारा अडवाणीच्या अंगात मंजुलीकाने प्रवेश केल्याचे लक्षात येते. त्यानंतर ट्रेलमध्ये एका ठिकाणी कार्तिक आर्यनचाही डबल रोल पाहालाय मिळाला आहे. हॉरर आणि कॉमेडी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे. ट्रेलरला तर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.