Monday, July 28, 2025
Homeक्रीडाचाहत्याने KL Rahul ला का दिली आथियाची शप्पथ?

चाहत्याने KL Rahul ला का दिली आथियाची शप्पथ?

इंडियन क्रिकेट टीमचा फलंदाज आणि आयपीएलच्या लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार केएल राहुल (kl rahul) सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या सिझनमध्ये केएल राहुलची बॅट थांबण्याचं नावच घेत नाहीये. मुंबई इंडियन्स विरूद्ध झालेल्या सामन्यात राहुलने दुसरं शतक झळकावलं आहे. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर केएल राहुलची जोरदार चर्चा होती.

अशातच केएल राहुलच्या (kl rahul) एका चाहत्याने त्याला चक्का अथिया शेट्टीची शपथ घालत एक भन्नाट मागणी केली आहे. या चाहत्याचं हे ट्विट व्हायरल झालं आहे.

सोशल मीडियावर एका चाहत्याने राहुलला त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अथिया शेट्टीची शपथ घेऊन फॉर्ममध्ये राहण्यास सांगितले आहे. यावेळी एका युझरने लिहिलं, राहुल तुला आथियाची शपथ आहे की, तुझा सध्याचा फॉर्म तु आपल्या पुढच्या आयसीसी टुर्नामेंटमध्ये कायम ठेवायचा.  तुझी आम्हाला खूप गरज आहे.

भारतीय क्रिकेट टीम ICC स्पर्धांच्या चांगली कामगिरी करताना दिसत नाही. 2017 ची चॅम्पियन ट्रॉफी फायनल, वर्ल्ड कप 2019 ची सेमीफायनल यामध्ये टीम इंडियाची खराब कामगिरी दिसून आली. यासाठी चाहत्याने केएल राहुलकडे ही खास मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -