Friday, March 20, 2026
Homeमहाराष्ट्रआणखी दोन दिवस पावसाचा जोर, राज्यातील 'या' भागाला दिला पिवळा इशारा

आणखी दोन दिवस पावसाचा जोर, राज्यातील ‘या’ भागाला दिला पिवळा इशारा

सध्या राज्यातील विविध भागांत सुरू असलेला उन्हाळी पाऊस आणि गारपिटीच्या घटना आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हवामान कोरडे होऊन पुन्हा तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून बाष्पीयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत होते. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह उन्हाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीच्या घटना घडल्या. आणखी दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उन्हाळी पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

 

उन्हाळी पाऊस पावसामुळे राज्याला वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. विदर्भात चाळीस अंशावर गेलेले कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसवर आले आहे. मात्र पाऊस उघडताच आणि ढगाळ हवामान कमी होऊन आकाश निरभ्र होताच पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -