Sunday, July 27, 2025
Homeतंत्रज्ञानभारतातील ‘या’ 3 सर्वात सुरक्षित कार महागल्या; ग्राहकांना बसणार महागाईचा फटका

भारतातील ‘या’ 3 सर्वात सुरक्षित कार महागल्या; ग्राहकांना बसणार महागाईचा फटका

गेल्या काही दिवसांपासून महागाईने सगळ्यांना परेशान केले आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या आणि सातत्याने लागणाऱ्या गोष्टी खूप महाग झाल्या आहेत. यात प्रामुख्याने सामान्य माणसाचे मरण होताना दिसून येत आहे. अशातच अनेकांचे स्वप्न असणाऱ्या ऑटो सेक्टरमधील काही वाहनांच्या किमती वाढल्यात आहेत. मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा & महिंद्रा, हिरो या कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत.

अशातच आता भारतातील सर्वात सुरक्षित आणि दमदार, शानदार असणाऱ्या कार महागल्या आहेत. कोणत्याही कार निर्मात्यासाठी उत्पादन खर्च खूप महत्त्वाचा असते. कोणत्याही मूळ उपकरणाच्या निर्मात्यासाठी एकूण खर्चाच्या 70 ते 75 टक्के सामग्रीची किंमत असते. यामुळे कंपनीच्या नफ्यावरही परिणाम झाला आहे. यामुळेच महिंद्र अँड महिंद्राची XUV300 च्या किमतीतही वाढ झाली आहे.

तसेच गेल्या काही महिन्यांत स्टील आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने वाहनांच्या किमती पाच ते आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक उद्देशाच्या वाहनांच्या किमती 2 ते 2.5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. टाटा नेक्सन, अल्ट्रोज यांच्या किमतीही वाढल्या आहेत.

भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी TATA मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने आपल्या अनेक वाहनांच्या आणि व्हेरियंटच्या किमती सरासरी 1.1 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -