सहावीतील मुलीवर अत्याचार करणार्या केंद्रशाळा गवाणेच्या फरार मुख्याध्यापक नथू सोनवणे याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि लांजा पोलिस शोध घेत आहेत. मंगळवारी 26 एप्रिल रोजी शाळेतील आणखी सहा मुलींचे या घटनेप्रकरणी जाबजबाब घेण्यात आले.
इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. हा प्रकार शनिवारी 23 रोजी उघडकीस आल्यानंतर रविवारी 24 एप्रिल रोजी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, शनिवारपासून हा मुख्याध्यापक फरार असल्याने त्याचा ठावठिकाणा अद्यापही लागलेला नाही.
संबंधित मुख्याध्यापक नथू सोनवणे याचा मोबाईल देखील स्वीच ऑफ असल्याने त्याचे लोकेशन देखील पोलिसांना मिळत नसल्याने त्याचा शोध कोठे घ्यायचा? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरी नथू सोनवणे याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. विविध पथके शोध घेत आहेत. मंगळवारी गवाणे केंद्रशाळेतील आणखी सहा मुलींचे जाबजबाब नोंदविण्यात आले