Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीशिवसेना खासदार Bhavana Gawali यांना ED चा समन्स, हजर न झाल्यास अटकेची...

शिवसेना खासदार Bhavana Gawali यांना ED चा समन्स, हजर न झाल्यास अटकेची टांगती तलवार!

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भावना गवळी यांनी ईडीने समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने समन्स बजावला आहे. समन्स पाठवत ईडीने भावना गवळी यांना पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे ईडीने भावना गवळी यांना या आधी अनेकदा समन्स बजावले होते पण त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. जर यावेळी त्या चौकशीसाठी हजर न राहिल्यास ईडीकडून त्यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) काढण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावले आहे. याआधी देखील ईडीने भावना गवळी यांना अनेक वेळा समन्स बजावले. पण भावना गवळी या काही कारणांमुळे चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे याप्रकरणी ईडीने भावना गवळी यांना पुन्हा समन्स बजावला असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. जर यावेळी भावना गवळी ईडी कार्यालयात हजर झाल्या नाही तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीकडून त्यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण 1992 सालचे आहे. भावना गवळी यांचे वडील पुंडलीकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्डाची पणन संचालकाकडे नोंद करून कारखान्याची स्थापना केली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमने बालाजी पार्टीकल बोर्डला 43 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. 2000 सालापर्यंत हा कारखाना फक्त उभा होता पण तो कधी सुरू झाला नाही. 2001 मध्ये भावना गवळी या कारखान्याच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर 2002 मध्ये भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची 14 हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने आपलीच दुसरी संस्था महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. विशेष म्हणजे हा व्यवहार करण्यासाठी भावना गवळी यांनी शासनाची परवानगी घेतली नव्हती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -