Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञान30 तास चालणारे ‘इतके’ स्वस्त Buds देतील डॉल्बी साउंडची मजा

30 तास चालणारे ‘इतके’ स्वस्त Buds देतील डॉल्बी साउंडची मजा

तब्बल 30 तास चालणारे इयरबड्स पाहून तुम्हाला ते घ्यावेसे वाटले असतील, त्यातही इतकी स्वस्त असल्याने आपण स्वतःला हे घेण्यापासून आवरू शकत नाही. Realme ने आपले नवीन TWS इयरबड्स, Realme Buds Q2s लाँच केले आहेत. अवघ्या 1,999 रुपये किंमतीत हे इयरबड्स थेट आपल्याला घरबसल्या मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रोडक्टची विक्री 2 मे पासून सुरू होईल.

Realme च्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, आपल्याला हे दमदार आणि शानदार इयरबड्स Flipkart, Amazon वरून सुद्धा खरेदी करता येणार आहेत. Realme चे हे बड्स अनेक उत्तम वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत. याचे सर्वात मोठे आणि चांगले वैशिष्ट्य म्हणजे त्याचा बॅटरी बॅकअप. हे बड्स तब्बल 30 तासांपर्यंत बॅटरी टिकवतात. या इयरबड्सची बॅटरी चार्जिंग केससह 30 तासांची असते.

Realme चा दावा आहे की, बड्सला अवघ्या 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 3 तासांचा बॅटरी बॅकअप मिळेल. बडस् आपोआप 7 तासांचा बॅटरी बॅकअप सपोर्ट देईल. या बड्सना चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट मिळतो.

हे भन्नाट फिचर देईल जास्त मजा :-

तुम्ही कॉलिंगसाठी Realme Buds Q2s Buds देखील वापरू शकता. कारण या बड्स मध्ये टच कंट्रोल फीचर देखील आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही टच करून म्युझिक बदलू शकता. तसेच सिंगल टचवर गेमिंग मोड चालू किंवा बंद करू शकता. या फिचरच्या मदतीने, तुम्ही कॉल उचलू शकता किंवा डिस्कनेक्ट करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -