ताजी बातमी ऑनलाईन टीम
कुपवाडमधील समता कॉलनी येथे राहणाऱ्या रवि रमेश देशमुख (वय २१) या तरुणाने येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस व्हरांड्यातील लोखंडी हुकाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.याबाबत अमर भिमराव वाघमोडे यांनी कुपवाड पोलिसात वर्दी दिली आहे. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.