ताजी बातमी ऑनलाइन टीम
प्रेमात आकंठ बुडलेल्या कपल्सचे जेव्हा ब्रेकअप होते तेव्हा त्यानंतर त्यांना अनेकदा डिप्रेशनचे शिकार व्हावे लागते. बॉलिवूडमध्ये ब्रेकअपचे प्रमाण खूपच वाढले आहे. ब्रेकअपमुळे अनेक कलाकार नैराश्याने ग्रासतात आणि त्यातून बाहेर पडायला त्यांना खूप वेळ लागतो. याच विळख्यात सध्या अभिनेता अमिर खानची मुलगी आयरा खानही सापडली आहे.
शेअर करत या गंभीर आजाराची माहिती दिली आहे. प्रचंड नैराश्यामुळे तिला एंग्जाइटी अॅटॅक येत आहे. पुढे काहीतरी भयानक होईल की काय या भीतीने तिला त्रास होत आहे. ऐन २३ व्या वर्षी डिप्रेशनचे (depression) परिणाम भोगत असलेल्या लेकीची अवस्था पाहून अमिर खानही चिंतेत आहे.
आयरा खान अमिर खान आणि रिना खान यांची मुलगी आहे. स्टार कीड असूनही ती बॉलिवूडपासून लांब आहे. सोशल मीडियावर मात्र सतत अॅक्टीव्ह असते. जाहिरात क्षेत्रात तिने काम सुरू केलं आहे. तिच्या या कामाची तिला खूपच आवड आहे. चार वर्षापूर्वी तिचे बॉयफ्रेंड मिशाल कृपलानीसोबत ब्रेकअप झाले. मिशाल हा संगीतकार आहे. आयरा आणि मिशाल त्यांच्या कामामुळे एकमेकांना वेळ देत नव्हते हे त्यांच्या ब्रेकअपचे कारण होते असं आयरानेच तिच्या सोशल मीडियावरून सांगितले होते.