Sunday, February 22, 2026
Homeब्रेकिंगपुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण

पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण

भारतीय सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत बरेच चढ उतार येत आहेत. मात्र गेल्या 4 दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाल्याचे समोर आले आहे. सोन्याच्या किमती घसरण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची मजबूती आहे, असे तज्ञांनी मत मांडले आहे.

कालही सोन्याच्या भावात घसरण झाली होती मात्र चांदीचे भाव स्थिर होते. अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईचा हंगाम जागतिक बाजाराच्या दबावाखाली असतानाही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आजच्या व्यवहारात 51 हजारांच्या आसपास सोन्याची विक्री होत आहे.
आज सकाळी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 1.21 टक्क्यांनी घसरून 51,128 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. या दरम्यान कालच्या किमतीच्या तुलनेत सोने 626 रुपयांनी स्वस्त झाले आहे. विविध वस्तूंच्या वाढत्या किमती, अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईचा हंगाम यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढेल, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

मागणी वाढली असली तरीही दर मात्र कमी होताना दिसत आहेत. लवकरच फेडरल रिझर्व्हची बैठक होणार आहे. अमेरिकेतील महागाई आणि रशिया-युक्रेन युद्ध या पार्श्वभूमीवर बँक या निर्णय घेते त्यावर सोन्याची पुढची दिशा ठरेल , असे जाणकारांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -